आज तारीख १२ जानेवारी … दोन थोर व्यक्तींचा आज जन्मदिवस पहिल्या राजमाता जिजाऊ आणि दुसरे आधुनिक भारताच्या उत्कट मानसिकतेचा उत्कट अविष्कार असणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस या दोन्ही थोर व्यक्तींना माझा अभिवादन.

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद या दोन्ही व्यक्तींचा जन्म दिवस एकाच दिवशी हा योगायोग म्हणा किंवा आणखी काही १६ व्या शतकातील राजमाता जिजाऊ यांचे विचार आणि १८ व्या शतकातील स्वामी विवेकानंदांचा विचार आणि कार्य यात नक्कीच साधर्म्य दिसत.

राजमाता जिजाऊ यांनी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांना घडवला त्यांच्या विचारणा दिशा दिली त्यातून महाराष्ट्रात अठरापगड जातींना एकत्र करून महाराजांनी वैभवशाली साम्राज्य निर्माण केला ..१६ व्या शतकात इथल्या समाज मनातली गुलामगिरीची मानसिकतेच उच्चाटन महाराजांनी केला त्या मागे नक्कीच त्यांच्या आईची प्रेरणा होती हे नक्कीच इथे सांगता येईल.अफजलखानाचा वाढ केल्यावर त्याची समाधी प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी बांधली .”खान गेला माणूस गेला त्या सोबत वैर हि संपला” यात जिजाऊ मातेच्या थोर पानाची प्रचीती येते.जात धर्म पंथ असा भेद न महाराजांनी केला न जिजाऊ नि.हे विचार आजही आपल्या देशाला आणि राष्ट्राच्या अखंडतेसाठी प्रेरक असेच आहेत .

स्वामी विवेकानंद यांचा बद्दल बोलायचा झाला तर त्यांच्या भगव्या कपड्यावरून काही धर्मांध संघटना ते आमचे असा धोशा लावतात पण तो दावा किती फोल आहे हेच दिसेल.

विवेकानंदानी म्हटला होता कि “मला माझा भारत घडवायचं त्यासाठी वेदांत मेंदू आणि इस्लामिक शरीर या दोघांची गरज आहे ”.अगदी सध्या सरळ भाषेत त्यांनी धर्मच तत्त्वज्ञान सांगितला .गीता वाचण्यापेक्षा फुटबॉल खेळा..या एका वाक्यातून त्यांच्या आधुनिक आणि पुरोगामी विचाराची महती कळते ..आजचा भारत घडवताना आपल्याला नवीन वेद आणि नवीन धर्म यांची गरज आहे हेच त्यांनी सांगितला होत.त्याचं पुढचे विचार जातिव्यवस्थे बद्दलचे विचार बघा.ज्या लोकांचा ५०० पिढ्यांनी वेद बघितलेले सुद्धा नाहीत त्यांना इथले ब्राम्हण वेद आणि इतर धर्मग्रंथाची भीती दाखवून छळतात ..जातीव्यवस्थेला जबरजस्त धक्का द्यायचं काम सुद्धा त्यांनी केलेला आहे.

आज आपल्याला राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचा विचारांची गरज आहे आणि त्यांचा विचारावरच हा देश आणि हे जग सुंदर आणि समाज हा एकसंध आणि निकोप राहू शकतो …जय हिंद!